विनाअनुदानित शिक्षकांना दिवाळीसाठी किराणा वाटप


लिंपणगाव प्रतिनिधी

नागवडे विद्यालयात आज रोजी अनुराधा राजेंद्र नागवडे ( संचालिका अ.नगर जिल्हा सहकारी बँक ) यांच्या हस्ते विद्यालयाचे प्राचार्य बी. एस शिर्के, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने एक सामाजिक दायित्व म्हणून विद्यालयातील विनाअनुदानित बांधवांना दिवाळी निमित्त किराणा पॅकेट देण्यात आले . यावेळी आदरणीय अनुराधावहिनी यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल खुप कौतुक करून आभार मानले. 

तसेच विनाअनुदानित बांधवांच्या व्यथा ऐकून त्यांना गहिवरून आले. याप्रसंगी त्यांनी अनुदान मिळवून देण्यासाठी लवकरच आपण पदवीधर शिक्षक आमदार सन्माननिय सुधीरजी तांबे साहेब यांच्या सहकार्याने

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचा कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थेतील सर्व प्राचार्य,  शिक्षक, यांनी आपल्या कुटुंबियांच्या वाढदिवसाच्या खर्चातून विनाअनुदानित बांधवांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्या स्वतः ही आपल्या मुलांच्या जन्मदिनी अशी मदत करणार आहेत असे नागवडे यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या