शेवगाव प्रतिनिधी
साखर कारखान्यांचा चालू गळीत हंगाम सुरू झाला असून सर्व कारखानदारांनी कोण किती साखर गाळप करणार ते जाहीर केले आहे पण नगर जिल्ह्यातील एकाही कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी उसाची पहिली उचल जाहीर केलेली नाही याच अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटना अहमदनगर यांच्यावतीने आज दिनांक 25 ऑक्टोबर 2021 रोजी प्रादेशिक सहसंचालक साखर अहमदनगर यांच्या दालनामध्ये ऊस दर संदर्भामध्ये जोरदार निदर्शने केली. याच दरम्यान प्रादेशिक सहसंचालक भालेराव यांच्याशी झालेल्या मीटिंगमध्ये साखर उद्योगाशी निगडित विविध प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली. त्यामध्ये मागील गळीत हंगामातील साखरेचा दर वाढल्यामुळे कारखानदार यांना चांगले दिवस आले आहे. पण शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 150 रु प्रति टन या प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा करावे तसेच चालू गळीत हंगामासाठी कारखाने सुरू होण्याच्या अगोदर पहिली उचल जाहीर करावी.
ऊस वजन काटा मध्ये बाहेरून होणारी छेडछाड रोखण्यासाठी योग्य ती कारवाई करावी.
ऊस तोडणी मजूर व वाहतूकदार व कारखान्याचे कर्मचारी यांच्याकडून होणारी पैशाची मागणी थांबवण्यासाठी योग्य ती कारवाई करावी. तसेच पुरगस्त शेतकऱ्यांचा ऊस प्राधान्य क्रमाने तोडण्यात यावा. या सर्व मागण्या संदर्भात कारखानदार प्रशासन व शेतकरी संघटना स्वाभिमानी यांच्यामध्ये तातडीची बैठक 30 ऑक्टोबर च्या अगोदर आयोजित करावी. या सर्व मागण्या संदर्भात प्रादेशिक संचालक साखर भालेराव यांनी लवकरात लवकर कारखानदार व संघटनेची बैठक लावून ऊस दरासंदर्भात चर्चा घडवून आणू असे बोलताना सांगितले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी पक्ष जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, नगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे ,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, तालुका अध्यक्ष प्रशांत भराट तालुका उपाध्यक्ष अशोक भोसले मेजर, युवकचे तालुका उपाध्यक्ष अमोल देवडे ,पाथर्डी तालुका अध्यक्ष शरद मरकड, संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते मच्छिंद्र आर्ले व इतर शेतकरी उपस्थित होते
0 टिप्पण्या