लोणी काळभोर
कुंजीरवाडी (ता. हवेली) गावाच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सचिन उद्धव कुंजीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मावळते अध्यक्ष तथा माजी सरपंच संतोष वामन कुंजीर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते. अध्यक्षपदासाठी सरपंच अंजू गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. २५) पार पडलेल्या ग्रामसभेत सचिन कुंजीर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे माजी तालुका संघटक स्वप्नील कुंजीर, माजी उपसरपंच सुरेश कुंजीर, भरत निगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, संग्राम कोतवाल, सागर निगडे, चंद्रकांत मेमाणे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापू घुले, चेअरमन सतीश कुंजीर, दिलीप कुंजीर. पाटील पोलीस मिलिंद कुंजीर, ग्रामसेवक प्रकाश गळवे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पदाच्या माध्यमातून गावातील वादविवाद सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असे, निवडीनंतर बोलताना सचिन कुंजीर यांनी सांगितले.
दरम्यान, तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया करावी लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, सरपंच अंजू गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष कुंजीर, शिवसेनेचे स्वप्नील कुंजीर आणि भाजपचे संग्राम कोतवाल यांनी योग्य भूमिका घेऊन तोडगा काढला. आणि प्रत्येक वर्षासाठी एक अध्यक्ष असे पुढील वर्षासाठी पाच अध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि सरपंच अंजू गायकवाड यांनी पुढील पाच वर्षासाठी सचिन कुंजीर, रामदास कुंजीर, अमर कुंजीर, राहुल कुंजीर आणि भाऊसाहेब कुंजीर यांची निवड ग्रामसभेत जाहीर करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या