पूर्वी गाव गाड्याचे जीवन हे सौजन्यशील - पोलीस निरीक्षक पवार


यवत 

पूर्वी गाव गाड्याचे जीवन हे सौजन्यशील, शांततेचे, एकोप्याचे आणि समाधानाचे होते. आजही अशा जीवनाची गरज भासू लागली आहे. गावातील सर्वच लहान थोरांनी मनावर घेऊन सहकार्य केल्यास तेच समाधान व आनंद आजही मिळेल, असे मत यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी बोरी ऐ नंदी येथे बोलताना व्यक्त केले आहे.

यावेळी सरपंच गणेश दौंडकर, जेष्ठ पत्रकार आणि माजी सरपंच एम,जी, शेलार, पोलीस पाटील रोशनी म्हेत्रे, रवींद्र गायकवाड, भीमराव भोसेकर , जीवन शेंडकर, संदीप म्हेत्रे, यांचेसह सदस्य कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

पवार आपल्या भाषणात पुढे म्हणाले, पूर्वीचे गावचे जीवन फारच आदर्शवत होते, गावातील चार जाणते लोक गावपण जपत होते, यामुळे सर्वसामान्य आनंदात रहात होते. आज सर्वच परिस्थिती बदलली आहे. तरीही गावातील लहान थोर सर्वांनी मनावर घेऊन सहकार्य करावे. यासाठी पोलिसही सहकार्य करतील.

यावेळी ग्राम सुरक्षा दल, तंटामुक्ती, यांची आवश्यकता व त्याची कर्तव्य ,ग्रामस्थांचे सहकार्य करण्याचे आवाहन पवार यांनी केले.

यावेळी माजी सरपंच एम,जी, शेलार यांचेही भाषण झाले. प्रास्तविक जीवन शेंडकर तर आभार रवींद्र गायकवाड यांनी मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या