दुसऱ्याचा विचार करणारे लोकं खूप कमी - डॉ तात्याराव लहाने


बोधेगाव 

संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड प्रतापराव ढाकणे यांनी आज स्वतःची प्रॉपर्टी तारण ठेऊन कारखान्यासाठी कर्ज काढले आणि मोठ्या संघर्षातुन हा कारखाना उभा करून या परिसरात नंदनवन फुलविले आहे. आजतागयत ढाकणे कुटुंबांनी स्वतःचा विचार न करता आपले सर्वस्व पणाला लावून ते दुसऱ्याचे विचार करतात तेच आज समाजाच्या भल्यासाठी कामी येतात. आज दुसऱ्याचे विचार करणारे लोकं या जगात खूप कमी आहेत.  ढाकणे कुटुंब आज कित्येक लोकांचे हित जोपासून आशीर्वाद घेत आहेत. असे प्रतिपादन पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांनी केले.

केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सण २०२१-२२ वर्षाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांच्या हस्ते तर श्री क्षेत्र मीराबाई संस्थानचे ह.भ.प. राधा सानप महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कारखान्याचे अध्यक्ष ऍड प्रतापराव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. तसेच बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ बुलढाणा अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक प्रभाकर कोलते यांच्या शुभहस्ते तर चार्टट अकौंटंट मयुरजी बंब यांच्या प्रमुख उपस्थितीत तर माजी सभापती मंगल काटे आणि संचालक माधवराव काटे यांचे हस्ते बॉयलरची विधीवत पुजा करण्यात आली आहे यावेळी आयोजित कार्यक्रमात पद्मश्री डॉ तात्याराव लहाने हे बोलत होते.

यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आश्विनकुमार घोळवे यांनी देखील बोलताना सांगितले की, कारखान्याचा गळीत हंगामा बद्दल उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.  दरवर्षी कारखान्याची ५०० टनाने कपॅसिटी कशी वाढवता येईल याकडे लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन घोळवे यांनी केले.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष ऍड प्रतापराव ढाकणे, तज्ञ संचालक ऋषिकेश दादा ढाकणे, राष्ट्रवादीचे पाथर्डीचे तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे, ऍड सिद्धेश ढाकणे, कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ प्रकाश घनवट, सर्वश्री संचालक बाळासाहेब फुंदे, तुषारभाऊ वैद्य, विठ्ठलराव अभंग, मयुरराजे हुंडेकरी, रणजीत घुगे, त्रिम्बक चेमटे, भाऊसाहेब मुंडे, सुरेशचंद्र होळकर, सुभाष खंडागळे, सतीश गव्हाणे, बापूराव घोडके, प्रकाश दहिफळे, बाळासाहेब शिरसाठ, बोधेगावचे माजी सरपंच भाऊराव भोंगळे, माजी सरपंच रामजी अंlधारे, सुधाकर तहकीक, माजी जिल्हा परिषद सदस्य गहिनीनाथ शिरसाठ, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बटुळे, कायदेविषयक सल्लागार ॲड दीपक देशमुख, बंटीसेठ जगताप,  गहिनीनाथ बडे, यांच्यासह परिसरातील शेतकरी, कामगार, संचालक, सभासद, कर्मचारी वर्ग , विविध क्षेत्रातील प्रमुख हे यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिगल ऑफिसर शरद सोनवणे यांनी केले तर प्रास्तविक कारखान्याचे तज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे यांनी केले तर आभार कारखान्याचे संचालक तुषार वैद्य यांनी मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या