Breaking News

व्यापारी कोमात ठेकेदार जोमात

सणसर- कुरवली रस्त्याची दुरावस्था


भवानीनगर प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यातील  सणसर - कुरवली या रस्त्याची खूपच दुर्दशा झाली होती म्हणून स्वतः राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लक्ष घालून या रस्त्याला भरपूर प्रमाणात निधी मंजूर केला पण त्या निधीचा पुरेपूर फायदा मात्र ठेकेदार ला झाला.

सणसर ते कुरवली या १०कि. मी. रस्त्याचे काम खूपच संथगतीने सुरू आहे. त्यात रस्ता ही निकृष्ट दर्जाचा आहे. सणसर व्यापारी पेठेतून हा रस्ता पुढे कुरवलीला  जातो. परंतु ऐन दिवाळीत ठेकेदाराने व्यापारी पेठेतील ५०० मीटर रस्ताच उकरून काढला. रस्त्याचे अंतर कमीअसल्यामूळे नागरिक आणि व्यापारी वर्ग यांना वाटले की चांगला रस्ता एक आठवड्यात पूर्ण होईल पण रस्ता उकरून ठेकेदार गायब झाला.

या ५००मीटर रस्त्याला तब्बल तीन आठवडे पूर्ण झाले तरीही रस्ता पूर्ण झाला नाही. त्यातच भवानीनगर येथील साखर कारखाना सुरू झाला आहे. त्यामुळे ऊसवाहतूकदार, व्यापारी, नागरीक यांना ठेकेदाराच्या चुकीच्या पद्धतीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदाराकडे  अर्थपूर्ण हित संबंध असल्यामुळे प्रशासन याकडे लक्ष देत नाही का ? अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या रस्त्याशेजारी कपड्यांचे दुकाने, दवाखाने, मेडिकल, हॉटेल्स, इलेक्ट्रॉनिक्स, सराफ पेठ आदींची दुकाने आहेत. ऐन दिवाळीत मात्र ठेकेदाराने व्यापारी वर्गाची झोप उडवली आहे.

रस्ता लवकर न झाल्यामुळे आमचे खूप मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या रस्त्यावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद असल्यामुळे  ग्राहक या रस्त्याने येत नाही. रस्ता लवकर न झाल्यास आम्हाला ठेकेदारा विरुद्ध आंदोलन करण्यास भाग पाडू नये.

- सणसर व्यापारी संघटना


No comments