जय बजरंग शेतकरी विकास पॅनलचा विजय निश्चित : शिवाजीराव कर्डिले


चिचोंडी पाटील 

मदडगांव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या 2021 च्या निवडणुकीत जय बजरंग शेतकरी विकास पॅनलचा विजय आजच निश्चित आहे. कारण दोन जागा वरील उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केला. 

मदडगांव येथील रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण भूमिपूजन आणि माजलगाव मदडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी जय बजरंग शेतकरी विकास पॅनलचे प्रचार प्रारंभाचा नारळ फोडण्याच्या कार्यक्रम प्रसंगी कर्डिले बोलत होते.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक हरिभाऊ कर्डिले सरपंच अनिल शेडाळे उपसरपंच आकाश आठरे , नानासाहेब रंगनाथ आठरे, जालिंदर तात्याबा काळे, एकनाथ शंकर शेडाळे, गोवर्धन पासी शेडाळे , मच्छिंद्र भाऊ शेडाळे ,मिठु गजाबा शेडाळे, मिठु तात्याबा शेडाळे,  रामदास गजाराम शेडाळे, जाईबाई दिलीप आठरे, शांताबाई श्रीधर शेडाळे, मनोज अभिमन्यु येरकळ आदी उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सरपंच अनिल शेडाळे यांनी संस्थेच्या कारभारा विषयी माहिती देत संस्था शेतकरी सभासदांना दरवर्षी लाभांश वाटप करीत आली आहे. तसेच संस्थेच्या निवडणुकीत संपूर्ण नवीन उमेदवारांना संधी देण्यात आल्याचे स्पष्ट केले.

यावेळी सेवा संस्थेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या बाबासाहेब पाराजी कांबळे, व अरुणा रामदास शिंदे या दोन्ही उमेदवारांचा माजी आमदार कर्डिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या