सभासदांचे हित जपणारी पतसंस्था असणे गरजेचे


ओतूर 

पतसंस्थांनी सभासदांचे हित जोपासणे गरजेचे असल्याचे मत मांडवी किनारा नागरी सहकारी पतसंस्था व मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिवाळी भेट वस्तू वाटप प्रसंगी जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी ओतूर येथे व्यक्त केले.

मांडवी किनारा नागरी सहकारी पतसंस्था मुख्य कार्यालय ओतुर येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी तांबे यांच्या अध्यक्षते खाली आयोजित दिवाळी भेट (थरमास व बॅग) या वस्तु वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार शरद सोनवणे बोलत होते.

मांडवी किनारा नागरी सहकारी पतसंस्था नवनवीन उद्योगांना कर्ज पुरवठा करून तरुण वर्गाला उद्योजक करण्यास चालना देत आहे. तर मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्था महिला सबलीकरण करिता कार्य करत असून त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे ते म्हणाले. या संस्था सभासदांना प्रतिवर्षी आकर्षक दिवाळी भेट देत असतात यावर विचार करून सभासदांना दैनंदिन वापरात यावी याकरिता चालू वर्षी पिण्याचे पाण्यासाठी थरमास तसेच टुरिस्ट बॅग देण्यात आली आहे. जेणेकरून या वस्तू सभासद ठेवीदार यांना वापरात आणता येतील असे मांडवी किनारा पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक संदीप बोचरे यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे संचालक गणपत डुंबरे,मल्हाराव डुंबरे, बबनदादा तांबे, विठठलदादा तांबे, आशिष शहा, सतिश गिते, रंजना डुंबरे, मिराबाई डुंबरे, डॉ.भरत घोलप, सिताराम ढमाले, ॲड.कैलास पानसरे, डॉ.संजय वेताळ व संस्थेचे सल्लागार विशाल बनकर, तसेच जि.प.सदस्य मोहीत ढमाले मोहित, पंचायत समिती सभापती विशाल तांबे, माजी सरपंच धनंजय डुंबरे व उपसरपंच प्रेमानंद अस्वार तसेच सुधिर घोलप तसेच कार्यक्रमास संस्थेचे सर्व शाखा व्यवस्थापक व कर्मचारी वृंद तसेच गावातील नागरीक उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या