विद्युत रोहित्र फोडणारे दोन थोडसं चोर जेरबंद


उरुळी कांचन प्रतिनिधी 

येथील गुन्हे शोध पथकाने एमएसईबीचे विद्यूत रोहित्र फोडणारे दोन चोरांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. एकून चार गुन्हे उघडकीस आले असून त्यांचेकडून ८० हजार ८०० किंमतीच्या १०१ किलोग्रॅम वजनाच्या तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या आहेत. 

याप्रकरणी अमित उर्फ काल्या बजरंग चव्हाण (वय २३, सध्या रा. फारूख शेख यांच्या गोठयाचे जवळ, शिवाजीनगर वस्ती, खेडशिवापुर ता. हवेली) व सागर विलास पवार ( वय २३, रा. आबा कोंडे यांचे चाळीत, खेडशिवापुर टोलनाक्याचे शेजारी, खेड शिवापुर ता. हवेली. दोघे मुळ रा.मु. पो. इंदिरानगर, कुडाळ, ता. जावली, जि. सातारा ) यांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार १३ ऑक्टोबर रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे तपास पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर यांना बातमीदारामार्फत कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हददीत दोन जण चोरी केलेल्या तांब्याच्या तारा विक्री करण्यास येणार आहेत अशी माहिती मिळाली. सदर बाब त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना कळवली. 

मिळालेल्या आदेशाप्रमाणे बातमीची खातरजमा करणेसाठी महानोर हे पोलीस हवालदार  नितीन गायकवाड, अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, संभाजी देविकर,निखिल पवार, शैलेश कुदळे, राजेश दराडे, बाजीराव वीर, दिगंबर साळुंके यांचेसमवेत गेले असता चव्हाण व पवार हे कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत संशयास्पदरित्या फिरताना आढळले. पोलीसांची चाहूल लागताच त्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांना शिताफीने पाठलाग करून पकडण्यात आले. अधिक विचारपुस करता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांना पोलीस ठाण्यात आणुन विश्वासात घेवून त्यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांनी विक्री करण्यास आलेले तांबे हे लोणी काळभोर परीसरांतील एमएसईबीचे ४ विद्यूत रोहित्रे फोडून काढले असल्याची कबुली दिली आहे. दोघांकडे मिळून आलेल्या ८० हजार ८०० रुपये किमतीच्या  १०१ किलोग्रॅम वजनाच्या तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या आहेत.  

सदरची उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर  नामदेव चव्हाण, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ मा. नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक  राजेन्द्र मोकाशी व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या