इकोफ्रेंडली आकाश कंदील कार्यशाळा


शहरटाकळी 

शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे दीपावली निमित्त इकोफ्रेंडली आकाश कंदील बनवा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी विद्यालयातील कलाशिक्षक शीतलकुमार गोरे यांनी या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे, पर्यावरणाचे रक्षण करणे हा हेतू  विशद करताना आकाश कंदील सोप्या पद्धतीने बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले व पर्यावरण रक्षण संदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये इ.5 वी 8 वीच्या एकूण 154 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. 

रंगीत कागद या इको फ्रेंडली साधनापासून विद्यार्थ्यांनी आकाश कंदील बनवले.

 विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, एकमेकांशी सहकार्याची भावना ठेवणे इत्यादी बाबी आजच्या कार्यशाळेतून  साध्य झाल्या.या कार्यशाळेत विद्यार्थी एकाग्रतेने आकाश कंदील बनवत असतानाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. विद्यालयाचे प्राचार्य संपत दसपुते यांनी कार्यशाळे मधील सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व कलेचे महत्त्व व पर्यावरणाचे महत्व आपल्या मार्गदर्शनातून विशद केले.

पर्यवेक्षिका अंजली चिंतामण, संस्था प्रतिनिधी अनिल मगर, शशिकांत काकडे, प्रवीण लददे, या वेळी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या