तालुक्यात पहिलीच कारवाई
ओतुर (ता.जुन्नर)
पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही इसम अनेकदा कायदेशीर कारवाई होऊनही सातत्याने अवैध दारू विक्री करत असल्याने व कायद्याला न जुमानता अवैध दारू धंदे सुरूच ठेवत आहेत. अशा अवैध व्यवसायांना वेळीच आळा घालुन त्यांचेवर प्रचलीत कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले.त्यानुसार ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका इसमावर एम.पी.डी.ए.कायद्या अंतर्गत कारवाई करून त्यास एक वर्षांसाठी स्थानबद्ध करण्यात येऊन त्याची थेट येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.
ओतुर पोलीस स्टेशन हद्दीतील वारंवार अवैध दारू धंदा करून दहशत माजवणाऱ्या इसमांचा अभिलेख तपासुन असे नियमीत गुन्हे करणाऱ्या इसमांची यादी तयार करण्यात आली.बाळु बबन नायकोडी, (वय - ३९) रा.डिंगोरे (शिवशाही हॉटेल), ता.जुन्नर जि.पुणे, मुळ रा.सांगणोरे याचेवर वारंवार अवैध दारू विक्री करणे, गर्दी जमाव जमवुन मारहाण करणे अतीप्रमाणात दारू पाजल्यामुळे मृत्यु होवु शकतो. हे माहिती असताना देखील एखादयास जाणीवपूर्वक दारू पाजुन त्याच्या मृत्युस कारणीभुत ठरणे, अशा प्रकारचे एकुण ६ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे कांबळे यांनी सांगितले वरील गुन्हयातील आरोपी बाळु बबन नायकोडी याचे विरूध्द ओतुर पोलीस ठाणे येथुन एम.पी.डी.ए.कायद्यांतर्गत प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक पुणे ग्रामिण यांचे मार्फत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे यांचेकडे सादर करण्यात आला होता. मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे यांनी सदर प्रस्तावामधील इसम बाळु बबन नायकोडी यास सदर कायद्यांतर्गत १ वर्षे स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत केले. त्यानुसार बाळु बबन नायकोडी यास पोलीस अधिकारी केरूरकर व पथकाने त्वरेने ताब्यात घेवून सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आली.पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पो.अधीक्षक मितेश घट्टे,जुन्नर उपविभागीय पोलीस अधीक्षक मंदार जवळे, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रा.चे पो.निरीक्षक अशोक शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरीक्षक पी.एच.कांबळे, पोलिस उपनिरिक्षक केरूरकर, आकाश शेळके, पोलिस हवा. पठारे, जगताप, पोलिस नाईक गोराणे, सुर्यवंशी, खेडकर, पो.कॉ.पवार यांचे पथकाने ही कारवाई केली.
0 टिप्पण्या