मंत्रीपुत्र आशिष मिश्राला पोलीस कोठडी


लखनऊ

लखीमपूर खिरी हिंसाचारातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली मात्र, पोलिसांनी १४ दिवसांची कोठडी मागितली होती. कोर्टाने आशिष मिश्राला कोर्टाने १२ ते १५ ऑक्टोबरपर्यंत अशी तीन दिवसांची पोलीस कोठडीत सुनावली आहे. आशिष मिश्रा हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आहे.

कोर्टाने काही अटीही घातल्या आहेत. आशिष मिश्रा हा १२ ऑक्टोबरपासून ते १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रहावं लागेल. यादरम्यान त्याची वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि त्याला कुठलीही मारहाण केली जाणार नाही. तो आपल्या वकिलांशी दूर राहून बोलू शकतो, असे सरकारी वकील एसपी यादव यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणात ८ जणांचा मृत्यू झाला होता. ३ ऑक्टोबरला ४ शेतकऱ्यांना कारखाली चिरडण्यात आले. या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा प्रमुख आरोपी आहे. १२ तासांच्या चौकशीनंतर शनिवारी रात्री लखीमपूरमध्ये त्याला अटक करण्यात आली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या