मोफत कॅन्सर तपासणी व दंत चिकित्सा शिबिर


मिरजगाव     
                

येथे मोफत कॅन्सर तपासणी व दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते‌.

कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील श्री.राणुबाई माता मंदिर जिर्णोद्धार कार्यक्रमाचे औचित्य साधून येथील त्र्यंबके, कटकधोंड, इंगळे, सोनवणे कुटूंबियाच्या पुढाकाराने मिरजगाव शहर डाॅक्टर्स असो. यांच्या विद्यमाने सदाशिव त्र्यंबके व विठाबाई त्र्यंबके यांच्या स्मरणार्थ हे शिबीर घेण्यात आले.

या शिबीरात कॅन्सर तपासणी, दंत चिकित्सा या विषयावर डॉ.सिद्धेश राजेंद्र त्र्यंबके ( टाटा हॉस्पिटल, मुंबई प्रशिक्षित ) डॉ.मृणाली कटकधोंड - त्र्यंबके यांनी विशेष मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला सरपंच सौ.सुनिता खेतमाळस, उपसरपंच संगिता वीरपाटील, रा.कॉ. डॉक्टर्स सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. चंद्रकांत कोरडे, प.स.सदस्य प्रशांत बुद्धीवंत, डॉ.पंढरीनाथ गोरे, राजेंद्र गोरे सर, हरिदास केदारी आदीसह त्र्यंबके, कटकधोंड, इंगळे, सोनवणे कुटूंबिय उपस्थित होते.

या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून अनेक रुग्णांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती, डॉ. त्र्यंबके यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या