ग्रामसुरक्षा दलास तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

२०० तरुणांनी केली ग्रामसुरक्षा दलात नाव नोंदणी


बारामती 

माळेगाव पोलीस चौकीच्या वतीने माळेगाव, सांगवी, शिरवली वस्ती येथील तरुणांना ग्राम सुरक्षा दलात सामील होण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी  आवाहन केले होते. दरम्यान या आवाहन प्रतिसाद देत तरुणांनी मोठ्या प्रमाणात ग्राम सुरक्षा दलात सहभाग नोंदवला आहे. आतापर्यंत २०० तरुणांनी नाव नोंदणी केली आहे. 

त्यासाठी माळेगाव पोलीस चौकीचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी स्वतः  गावात बैठकी घेऊन तरुणांना मार्गदर्शन केले आहे.

ऐन सणासुदीच्या काळात पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आहे. सणानिमित्त मोठ्या प्रमाणात  नागरिकांची गावाकडे ये-जा चालू झाली आहे.अशा  वेळी संध्याकाळच्या वेळी चोऱ्या होण्याची दाट शक्यता असते. दरम्यान या चोऱ्या टाळण्यासाठी पोलीस व तरुणांच्या  सहभागातून ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात आली आहे. युवकांनी पोलिसांना सहकार्य करावे. तसेच अपघातग्रस्तांना मदत करणे, गावातील घडामोडीची खबर देणे, अवैध धंद्यांची माहिती देणे, संशयास्पद व्यक्ती, चोरी उघडकीस आणण्यास मदत करणे आदी कामे करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. असे मत माळेगाव दूरक्षेत्रचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी व्यक्त केले. सणासुदीच्या काळात वाढत्या चोऱ्या व इतर अनुचित प्रकार घडू नये,यासाठी माळेगाव पोलीस दूरक्षेत्रातर्फे ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे.

त्या आवाहनास हाक देऊन मोठ्या प्रमाणात पूर्ण ग्राम सुरक्षा दलात सामील होऊन उत्स्फूर्तपणे आपल्या गावात रात्री बारा ते चार दरम्यान गस्त करताना पहावयास मिळत आहेत. याबाबत घुगे यांनी पंचक्रोशीतील तरुणांना आवाहन केले आहे की आणखी ज्या ज्या तरुणांना ग्राम सुरक्षा दलात सामील व्हायचे आहे त्यांनी माळेगाव पोलीस चौकीला संपर्क साधावा. सदरचे ग्राम सुरक्षा दलातील तरुणांना माळेगाव पोलीस चौकीचे रात्रगस्त चे अमलदार हे गावोगावी जाऊन भेटी देऊन त्यांचे कर्तव्य बाबत मार्गदर्शन करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या