स्पायडरमॅन प्रमाणे भिंतीवर चढणारा बेडूक


शिरूर कासार 

स्पायडरमॅन प्रमाणे भिंतीवर,झाडावर चढण्यात पटाईत असणारा बेडूक सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र तागडगाव येथे सर्पराज्ञीचे संचालक वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे यांना घराच्या भिंतीवर आढळून आला.

या बेडका बाबत माहिती देताना सर्पराज्ञी चे संचालक वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे यांनी सांगितले की, मराठवाड्यासारख्या दुष्काळीभागात क्वचित आढळणारा हा बेडूक कोकणात सामान्यपणे सर्वत्र आढळून येतो. कोकणात या बेडकास "चुनाम" नावाने ओळखले जाते.या बेडकाचे नाव "इंडियन कॉमन ट्री फ्रॉग" (Common Tree Frog)असे आहे.हा बेडूक ओलसर जागी व घनदाट जंगलात जास्त राहणे पसंत करतो . यावर्षी मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हा बेडूक दुष्काळग्रस्त मराठवाड्यात आढळून आला आहे .या बेडकाचे दुष्काळग्रस्त भागात आढळणारे हे पर्यावरणीय गुणवत्ता चांगली असल्याचे द्योतक होय .हा बेडूक पाण्यात राहण्यापेक्षा झाडावर राहण्यास पसंत करतो.

या बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या हाताच्या व पायाच्या बोटातुन चिकट द्रव स्त्रावत असतो. या चिकट स्त्रावामुळे हे बेडक सहजगत्या झाडावर व भिंतीवर चढतात. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या