कृषीकन्येने दिले मुरघास प्रक्रियेचे मार्गदर्शन


जेजुरी प्रतिनिधी

जयवंतराव भोसले कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक या महाविद्यालयातील कृषिकन्या धनश्री पांढरे (रा.बेलसर ता. पुरंदर, जि. पुणे) हिने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्या निमित्ताने बेलसर येथील शेतकऱ्यांना उपयुक्त असणारा मुरघास म्हणून याबाबत मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांना शेतीबरोबर पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात केला जातो. यासाठी शेतकऱ्यांना हिरव्या चाऱ्याची गरज भासते. परंतु वर्षभर शेतकऱ्यांना हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांच्या जनावरासाठी वर्षभर मुरघास हा चांगल्या प्रतीचा चारा मिळतो. शिवाय हा चारा चविष्ट असल्याने जनावरांसाठी आवडीचा असून मुरघास हा हिरव्या चाऱ्यापेक्षा पौष्टिक मानला जातो.प्रामुख्याने मुरघास यामध्ये जनावरांच्या दूध वाढीसाठी व सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण गुणधर्म असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला प्रतीचा चारा सहज उपलब्ध व्हावा या उद्देशाने धनश्री पांढरे हिने बेलसर येथील शेतकऱ्यांना मुरघासाची प्रात्यक्षिक करून त्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांच्या चाऱ्याविषयी असणाऱ्या समस्यांचे निवारण केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या