उल्लेखनीय कार्याबद्दल 'व्यंकटेशला' पुरस्कार


बोधेगाव 

आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यंकटेशचा " ईमर्जिंग मल्टीस्टेट ऑफ द महाराष्ट्र ” पुरस्कार देउन सन्मान करण्यात आला.

मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यंकटेश उद्योग समुहाचे चेअरमन अभिनाथ शिंदे यांना महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पुरस्कार देउन 

सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून सहकारातील प्रमुख उपस्थित होते. पुरस्कार स्विकारल्या नंतर शिंदे यांनी सांगितले हा पुरस्कार आमचा नसुन व्यंकटेशमधील २ लाख समाधानी ग्राहकांचा आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील व्यंकटेश मल्टीस्टेट गेली १० वर्षांपासून बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असणारी एकमेव संस्था असून या संस्थेचे महाराष्ट्र व कर्नाटकासह एकूण २२ शाखांचे विस्तीर्ण जाळे आहे. ३१ मार्च २०२१ अखेर संस्थेने ३०० कोटीचा व्यवसाय पूर्ण केला आहे. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन व्यंकट देशमुख,  संचालक अनिल गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा मसुरे आदी उपस्थित होते . 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या