Breaking News

ॲड.नाजिम शेख यांना आदर्श कार्यगौरव पुरस्कार जाहीर


आळंदी 

महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेले श्रीक्षेत्र आळंदी येथील प्रसिद्ध विधितज्ञ समाजसेवक ॲड.नाजिम शेख यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी आयोजित राज्यस्तरीय गुणीजन गौरव परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाज रत्न पुरस्कार २०२१ जाहीर झाला असल्याचे मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे अध्यक्ष ॲड.कृष्णाजी जगदाळे यांनी सांगितले आहे.

ॲड.नाजिम शेख हे आळंदीतील युवक वर्गाचे मार्गदर्शक म्हणून सर्वांना परिचित आहे,तसेच श्रीक्षेत्र आळंदी येथील दुर्लक्षित पुरातन जलकुंडांचा शोध घेऊन ती जलकुंड सर्व समाजाला, वारकऱ्यांना,भाविकांना खुली करण्याच्या योगदानाबद्दल ॲड.नाजिम शेख यांना आदर्श कार्यगौरव समाज रत्न पुरस्कार २०२१ जाहीर झाला असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.


No comments