आदर्श पिक पद्धतीने हरभरा पिकाची उत्पादकता वाढवू : अडसूळ


मिरजगाव                   

कर्जत तालुक्यातील मिरजगाव मंडळामध्ये हरभरा पिकाची उत्पादकता सर्वात कमी म्हणजे ९.० क्विंटल प्रती हेक्टर आहे, या प्रकल्पाच्या माध्यमातून हरभरा पिकाची आदर्श पिक पद्धती शेतकऱ्यांपर्यत पोहचवून ही उत्पादकता हेक्टरी १५ क्विंटल पर्यंत नेण्यासाठी प्रयत्न कृषी विभाग करणार असल्याची माहिती, मंडळ कृषी अधिकारी अमर अडसुळ यांनी दिली. 

मिरजगाव येथे हरभरा प्रमाणित बियाणे सप्ताह कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे शेतकऱ्यांना रब्बी हंगाम प्रकल्पा अंतर्गत निमगाव गागंर्डा येथील शेतकऱ्यांना हरभरा पिकाचे बियाणे वाटप करण्यात आले. 

या कार्यक्रमात उगवणक्षमता तपासणी, बीज प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून वाटप करण्यात आले. 

प्रकल्पा अंतर्गत कृषी सहाय्यक सागर जवणे यांनी हरभरा उत्पादकता वाढीवर मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमामध्ये कृषी पर्यवेक्षक रामदास राऊत यांनी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले. तसेच बापूसाहेब होले सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा कर्जत यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.  मंडळांमधील  सर्व अधिकारी, कर्मचारी व निमगाव गांगर्डा मधील शेतकरी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या