'टीडीएफ' चा विचार शिक्षकांनी जिवंत ठेवावा : डॉ. सुधिर तांबे


श्रीगोंदा प्रतिनिधी

टीडीएफ अर्थात शिक्षक लोकशाही आघाडी या जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये कार्यकारिणी घोषित होत आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यातील कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली.

आमदार डॉ. सुधीर तांबे तालुका अध्यक्ष, बाळासाहेब भोर,उपाध्यक्ष राजेंद्र कळमकर निवृत्ती शेलार, सचिव 

 सचिन जामदार,सहसचिव जगताप सुरेश, संपत पवार, खजिनदार सचिन झगडे या नविन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. तसेच 'रयत'च्या जनरल बॉडी वर निवड झाल्याबद्द्ल बाजीराव कोरडे व प्रशांत खामकर रयत सेवक संघावर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी प्राचार्य एम.एस. लगड यांनी टीडीएफ संघटना पुढील आव्हाने व त्या आव्हानांना दाद लागू न देता टीडीएफ फिनिक्स पक्षाप्रमाणे पुढे झेप घेईल असा आशावाद व्यक्त केला. संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी संघटने समोरील आव्हानांवर चर्चा केली. डॉ. सुधीर तांबे यांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या व म्हणाले, शिक्षक हा समाजाचा आत्मा आहे. तसेच टीडीएफ ही केवळ संघटना नसून एक पुरोगामी विचारधारा आहे. तिचा विचार जिवंत ठेवण्याचे काम आपण सर्वांनी मिळून केले पाहिजे, असे आवाहन केले. टीडीएफ जिल्हा कौन्सिल सदस्य मच्छिंद्र लगड, हरिश्चंद्र नलगे, मधुकर पवार, रमजान  हवालदार जयसिंग  टकले, राजेंद्र खेडकर, दिलीप काटे, देविदास खेडकर, देवराम दरेकर, रामदास जंजिरे, वसंतराव  दरेकर,दीपक धारकर,सतिश गांजुरे, रमेश लाकुडझोडे, अमोल गवळी,उद्धव गायकवाड, नंदकुमार शितोळे, प्रसिध्दी प्रमुख किशोर सोलाट हे उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या