शेवगाव प्रतिनिधी
पुणे येथील जमाबंदी आयुक्त कार्यालयातील राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी, मंडळाधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डुबल यांना व्हाट्सअप ग्रुपवर अर्वाच्य भाषा वापरल्या प्रकरणी त्यांची बदली करावी या मागणीसाठी शेवगाव तालुक्यातील तलाठी संघटनेचे अध्यक्ष किशोर पवार यांच्या नेतृत्वाखाली शेवगावचे तहसीलदार छगनराव वाघ यांना लेखी निवेदन देऊन तालुक्यातील तलाठी यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
सदरील शेवगाव येथील तलाठी संघटनेने शेवगावचे तहसीलदार छगन वाघ यांना दिलेल्या लेखी निवेदनात नमूद केले आहे की, पुणे येथील जमाबंदी आयुक्त कार्यालयातील राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी, मंडळाधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डुबल ( आप्पा ) यांना व्हाट्सअप ग्रुपवर अर्वाच्य भाषा वापरल्या प्रकरणी त्यांची बदली करावी. तसेच महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी, मंडळाधिकारी महासंघाने पुकारलेल्या आंदोलनाचा हा तिसरा टप्पा असून सर्व तलाठी व मंडळाधिकारी यांचे डी. एस. सी. जमा करण्यात यावे. या मागणीसाठी तलाठी संघटना यांनी तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
0 टिप्पण्या