विकास कामांसाठी राष्ट्रवादी कॉग्रेस आक्रमक


भोर 

पालिकेत सत्ताधारी पक्षाच्या वतीने विकास कामांचे खोटे चित्र उभे केले जात असून एक हाती सत्ता असल्याने पालिकेच्या कारभारात मिलीभगत चालू असल्याचा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे आरोप केला आहे.कोट्यावधी रुपयांची मंजूर विकास कामे मार्गी लावण्यासाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

शहराच्या विकासासाठी नगर विकास विभागाच्या वतीने १:५ लक्ष रुपयांची कामे मंजूर झाली असून प्रलंबित कामे मार्गी लावण्या ऐवजी पालिकेतील लोकप्रतिनिधी बेकायदेशीर कामात अडकून पडल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी केला आहे.शहरातील आमराई आळी पाणी चोरी प्रकरण,बेकायदेशीर बांधकाम,गाळे वाटपातील भ्रष्टाचार,वीज चोरी,रस्त्यांची अर्धवट आणि निकृष्ट कामे,उद्यानाची दुरवस्था इ.प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींसह पालिका प्रशासन सोयीस्कर डोळेझाक करीत असून प्रलंबित विकास कामे तसेच अनाधिकृत कामाबाबत पालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा विठ्ठल शिंदे यांनी दिला आहे.यावेळी माजी गटनेते यशवंत डाळ,राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुहित जाधव, व्हीजेएनटी सेलचे विक्रम शिंदे,बाळासाहेब खुटवड, राजेश शिंदे,धीरज चव्हाण,चेतन जाधव उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या