पुणे
गेली कित्येक वर्षे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक आणि बेकायदेशीर पिळवणूक करणाऱ्या पुण्याच्या महापालीकेविरोधात आता आवाज उठू लागला आहे. महापालिकेच्या विविध खात्यात ठेकेदारा मार्फत काम करणारे ४ हजार कर्मचारी यांना वेळेवर पगार होत नाही म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज आयुक्तांना घेराव घालण्यात आला.
अखेरीसमहापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या दालनात बैठक बोलवली या बैठकी मधे आयुक्त यांनी पुढिल दोन दिवसात सुरक्षा रक्षक यांचे पगार होतील व पुढिल आठवडा मधे इतर सर्व खात्या मधिल कर्मचारी यांचे पगार होतील हे आश्वासन दिले.
तसेच जे ठेकेदार वेळेवर पगार करत नाही त्यांना काळ्या यादीत टाकायचे आदेश दिले व पुढिल महिण्यात या पद्धती मधे एक नियमावली करून ते मान्य करुन प्रत्येक कर्मचारी यांचा महिन्याच्या ७ तारखेच्या आत त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असे आश्वासनही त्यांनी दिले.
स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, गटनेत्या फरझाना शेख, नगरसेविका हिमाली कांबळे, शहराध्यक्ष संजय सोनवणे , राज्याचे सहसचिव बाळासाहेब जानराव , अशोक कांबळे, अशोक शिरोळे,नगरसेवक अयुब शेख, बसवराज गायकवाड, बाबुराव घाडगे , शैलेश चव्हाण, वसंतराव बनसोडे , महिला अध्यक्ष शशीकला वाघमारे व सर्व पदाधीकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या