कोंभळीकरांचा गरजूंना किराणा वाटप उपक्रम कौतुकास्पद : जाधव


मिरजगाव 

दिवाळी निमित्त गरजूंना किराणा वाटप हा कोंभळीकरांचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी केले आहे.

कर्जत तालुक्यातील कोंभळी येथे स्वाभिमानी शेतकरी ग्रामविकास पॅनल व स्व.उपसरपंच गोरक्ष नाना गांगर्डे मित्र मंडळ यांच्या वतीने दिवाळी निमित्त ३०० गरीब - गरजू  कुटुंबियांना किराणा वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी सरपंच शर्मिला राहुल गांगर्डे, उपसरपंच सविता उदमले, दिपक गांगर्डे, चेअरमन मारूती गांगर्डे, राहुल गांगर्डे, पै.सचिन दरेकर, देविदास काकडे, कृषी अधिकारी मुकुंद पाटील, शेखर खरमरे, चांदमल गांगर्डे, धनराज गांगर्डे, उद्योजक राहुल गांगर्डे, साहेबराव काकडे, नितिन उदमले, शिवाजी भापकर, ग्रामविकास अधिकारी शरदराव कवडे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

जाधव म्हणाले, समाजातील गरिब - गरजू कुटूंबियांना किराणा वाटप करुन सातत्याने विविध सामाजिक उपक्रमात पुढे असणा-या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ३०० कुटूंबियांची यंदाची दिवाळी गोड केली आहे.

यावेळी स्व.उपसरपंच गोरक्ष गांगर्डे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या वैयक्तिक लाभ योजनेच्या फलकाचे अनावरण गटविकास अधिकारी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. वैयक्तिक योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन, माजी सरपंच दिपक गांगर्डे यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या