भवानीनगर प्रतिनिधी
वालचंद नगर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत एकूण १ लाख ८ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी
संतोष भिवा जाधव (वय- ४२ वर्ष), हणुमंत गोपाळ कुंभार (वय-३४) वर्ष दोन्ही (रा. निंबोडी, ता.इंदापुर जि. पुणे), दत्तात्रय गुलाब निंबाळकर, (वय-५५ वर्ष) , संजय बापु गर्जे, (वय-३६ वर्ष) दोन्ही (रा.भवानीनगर, ता.इंदापुर, जि.पुणे) , भगवान राजेद्र अगरकर (वय-५२ वर्ष), (रा.बोरी ता.इंदापुर,जि.पुणे) ,सोमनाथ (जंगल) प्रकाश जगताप, (रा.सणसर, ता.इंदापुर, जि.पुणे), हणुमंत दादा धोतरे (रा.सणसर ता इंदापुर जि पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
इंदापूर तालुक्यातील मौजे- संणसर गावच्या हद्दीत कँनलच्या कडेला झाडाच्या आडोशाला मोकळ्या जागेत बेकायदा बिगर परवाना तीन पत्ती नावाचा जुगार खेळ खेळत असताना त्या ठिकाणी वालचंद नगर पोलिसांनी धाड टाकत जुगाराची साधने , रोख रक्कम व मोटारसायकल असे एकूण १ लाख ८ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
या मध्ये आरोपी सोमनाथ (जंगल) प्रकाश जगताप, (रा.सणसर, ता.इंदापुर, जि.पुणे) हा पोलीसांची चाहुल लागताच पळुन गेला. पुढील तपास पोलीस हवालदार पाटील हे करीत आहेत.
0 Comments