साईभक्तांना खुशखबर..!

शिर्डीत विमानांचे लँडिंग अन् टेकऑफ सुरु


कोपरगाव

देश-विदेशातील कोट्यवधी साईभक्तांना खूशखबर आहे की, कोरोनामुळे तब्बल दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेली शिर्डीतील विमानसेवा अखेर काल (रविवार) पासून सुरु झाली आहे. सकाळी 11.30 वाजता दिल्ली येथून पहिले विमान शिर्डी विमानतळावर लँडींग झाले तर दुपारी 12.30 वाजता याचे विमानाने पुन्हा दिल्लीकडे जाण्यास टेकऑफ घेतले.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. शिर्डी विमानतळांची सेवा बंद होती, पण ही सेवा सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. काल दिल्ली, हैदराबादसह चेन्नईमधून साईभक्तांना घेऊन विमानांनी शिर्डी विमानतळावर लँडिंग केले. पुन्हा परतीच्या दिशेने हवेत टेकऑफ घेतले.

येणारी-जाणारी विमाने अशी... 

(दि. 10) ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता दिल्ली येथून शिर्डीत पहिलं विमान दाखल झाले. दुपारी 12.30 वाजता याच विमानाचे दिल्लीकडे जाण्यासाठी टेकऑफ झाले.

दुपारी 2.30 वाजता हैदराबाद येथून शिर्डीत विमान उतरले तर दुपारी 3 वाजता पुन्हा हैदराबादला जाण्यास टेकऑफ घेतले.

दुपारी 4 वाजता चैन्नई येथून शिर्डीत विमान आले तर दुपारी 4.30 वाजता पुन्हा चैन्नईकडे रवाना झाले. 

घटस्थापनेपासून देऊळ सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. त्यामुळे मंदिरे सुरु झाल्याने भाविकांना आता शिर्डीतील साईबाबांचे दर्शनसुद्धा घेत आहेत. आता विमानतळ विकास प्राधिकरणाने हे विमानतळ नागरिकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिर्डी विमानतळावर सुरुवातीला स्पाईसजेट, इंडिगो एअरलाइन्सची सेवा दिल्ली- हैदराबाद आणि चेन्नईसाठी असणार आहे. त्यानुसार विमानाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या