जगात बुद्धी ही सर्वश्रेष्ठ शक्ती : अनंत कुलकर्णी


ढोरजळगाव 

जगात बुद्धी ही सर्वश्रेष्ठ शक्ती असून अफाट बुद्धिमत्ता आबासाहेबांना लाभलेली होती. हाच न्याय परमेश्वराने काकडे कुटुंबीयांना दिला आहे म्हणून मी आबासाहेबांच्या जीवन चरित्र ग्रंथाला 'न्याय हा परमेश्वराचा' हे शीर्षक दिले आहे. आबासाहेबांनी आपल्या आयुष्यात विदुराची भूमिका बजावली. महाभारतातील विदुर हे धृतराष्ट्राचे 

भाऊ होते. पण त्यांनी कौरवांची बाजू न घेता नेहमी पांडवांची बाजू घेतली. जेथे न्याय होतो तेथे  विदूर होते .तसेच आबासाहेब देखील नेहमी न्यायाच्या बाजुने वाटचालीची भुमिका घेतली असे प्रतिपादन लेखक अनंत कुलकर्णी यांनी बोलताना व्यक्त केले.

ढोरजळगांव ता शेवगांव येथील श्रीराम माध्य व उच्च माध्य विद्यालयात आबासाहेब काकडे यांचे ४३ वे पुण्यस्मरणा प्रसंगी आयोजित कार्यक्रमात कुलकर्णी बोलत होते. यावेळी अनंत कुलकर्णी लिखित 'न्याय हा परमेश्वराचा' या आबासाहेबांच्या जीवनावरील चरित्र ग्रंथाचे प्रकाशन विशेष कार्य अधिकारी मंत्री पशुसंवर्धन दुग्धविकास क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, मुंबई अशोक चेमटे यांच्या हस्ते करण्यात आले. हर्षदा काकडे म्हणाल्या की आबासाहेबांचे शाश्वत विचार घेऊन मी व पती शिवाजीराव काकडे पुढची भविष्याची वाटचाल करत आहोत. आबासाहेबांचे अपूर्ण राहिलेले कोपरे धरणाचे स्वप्न पुर्ण करण्याची ग्वाही दिली. 

यावेळी उद्योग संचालक,  प्रमोद लांडे, आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष, शिवाजीराव काकडे , शिवनाथ देवढे,अन्न सुरक्षा अधिकारी  डॉ. प्रदिप पवार, जिल्हा सहकारी बँकेचे शेवगांव तालुका विकास अधिकारी भाऊसाहेब चेके, राजाजी बुधवंत, आरोग्य विस्तार अधिकारी, सुरेश पाटेकर,  बापूसाहेब पाटेकर, सुधाकर लांडे,  रघुवीर उगले,  शहादेव खोसे, अनंता उकिर्डे, गणेश कराड,  विक्रम उकिर्डे, भिवसेन केदार,  संदीप वाणी, रज्जाक शेख, उदय बुधवंत रमेश भालसिंग, रतन आल्हाट,  देवदान आल्हाट,  म्हातारदेव आव्हाड, अशोक आव्हाड, मारुती पांढरे, राजू पुंडेकर, देवीदास पाटेकर, विश्वास जायभाये, जयकुमार देशमुख,  संभाजी फसले , संभाजी लांडे,  महादेव पाटेकर, सुभाष दिवटे, भारत भालेराव,  बाळासाहेब कराड, आदीसह ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य,  कांतेश्वर ढोले यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश तेलोरे, सचिन कुलकर्णी यांनी केले. यावेळी अनाथ मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या