हवामानाची अचुक माहिती देण्यासाठी कटिबध्द - डख


ढोरजळगांव

आता पाच ते साह दिवस हवामान कोरडे राहून थंडी सुटणार असून शेतकऱ्यांनी घाबरण्याचे काही कारण नाही ,सध्या पाऊस येणार नाही त्यामुळे आपण कापूस वेचणी करून घ्यावी पाऊस येणार असेल तर मी शेतकऱ्यांचा मित्र म्हणून शेतकऱ्यांचे कुठलेही नुकसान होऊ देणार नाही शेतक-याचा मुलगा म्हणुन मला बळीराजाची निश्चित जाण आहे म्हणुन शेतकरी हितासाठी हवामानाची अचुक माहिती देण्यासाठी कटिबध्द आसल्याचे  प्रतिपादन हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले,

 ढोरजळगांव ता शेवगांव येथे पंजाबराव डख यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

पुढे बोलताना हवामान अभ्यासक पंजाबराव डख म्हणाले की ,मी एक शेतकरी आहे, हवामानाचा अभ्यास असल्यामुळे पर्यायाने शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये यासाठी हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांना मी देत असतो त्या अनुषंगाने शेतकरीदेखील आपल्या मालाचे नुकसान होऊ नये त्यासाठी या अंदाजाप्रमाणे आपले शेतातील माल काढणे ,पेरणी करणे, हे माझ्या अंदाजानुसार ते करत आसतात, आता आठ ते दहा दिवस हवामान कोरडे राहुन थंडी पसरणार आहे, धुईचे देखील प्रमाण वाढणार आहे, माझे शेतकरी मित्र असल्याने वारंवार त्यांना हवामानाविषयी माहिती देत राहावं असं मला वाटतं कोणाचे नुकसान व मी होऊ देणार नाही, शेतकऱ्यांना पेरणी विषयी व विविध समस्या विषयी हवामान  अभ्यासक पंजाबराव डख  यांनी मोलाचं मार्गदर्शन केले ,

यावेळी संजय कोळगे, बापुसाहेब पाटेकर, देविदास पाटेकर सुधाकर लांडे,राजेंद्र देशमुख,महादेव पाटेकर,गणेश कराड,आनंता ऊर्किडे,रोहन साबळे,डॉ प्रदिप पाटेकर आकाश साबळे,गणेश जायभाये,गणेश पाटेकर, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या