फराळामुळे दिवाळीचा गोडवा वाढतो


नगर 

दिवाळीच्या मंगलमय व आनंददायी सणावेळी फराळाला विशेष महत्त्व असते. दिवाळीनिमित्त घरी येणारे पाहुणे, नातेवाईक, मित्र परिवाराचे स्वागत फराळाने करण्यात येते. पूर्वी घरोघरी महिनाभर आधीपासून फराळ तयार करण्याची लगबग असायची. मात्र सध्याच्या धावपळीच्या युगात घरी फराळ बनवणे शक्य नसल्याने बाजारातील तयार फराळ घेण्याकडे सर्वांचा कल वाढला आहे. त्यामुळे बाजारात घरगुती चवीचा व स्वादमय फराळ मिळाल्यास त्याची आवर्जुन खरेदी केली जाते. नगरच्या नवीपेठ भागात कासवा जनरल स्टोअर्समध्ये उपलब्ध झालेला महावीर भवनचा अल्पदरातील रूचकर फराळ सर्वांच्याच पसंतीस उतरणारा आहे, असे प्रतिपादन अहमदनगर मर्चंटस बॅंकेचे चेअरमन आनंदराम मुनोत यांनी  केले.

नगरच्या नवीपेठ येथील कासवा जनरल स्टोअर्समध्ये दिवाळीनिमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित महावीर भवन येथील अल्पदरातील फराळ विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. या फराळ विक्रीचा शुभारंभ करताना चेअरमन आनंदराम मुनोत बोलत होते. 

अनिल पोखरणा म्हणाले की, नवीपेठ परिसर नगरच्या मध्यवर्ती भागातील मुख्य बाजारपेठ आहे. याठिकाणी दिवाळीच्या विविध खरेदीसाठी ग्राहक येत असतात. त्यांना अन्य खरेदीबरोबरच दीवाळी फराळाची खरेदीही कासवा जनरल स्टोअर्समध्ये करता येणार आहे. दर्जेदारपणा व उत्कृष्ट चवीमुळे येथील फराळ अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या