बारामती
बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने शिवरक्षक शूरवीर जिवाजी महाले यांची ३८६ वी जयंती शारदा प्रांगण येथे (दि:१६) रोजी साजरी करण्यात आली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी बारामती तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर माने, कार्याध्यक्ष - सुरेश साळुंके, सचिव -किरण कर्वे, सहसचिव किसन भाग्यवंत, खजिनदार- गणेश चौधरी, अनिल दळवी तसेच शिवरक्षक शूरवीर जिवाजी महाले यांचे ११ वे वंशज संतोष सपकळ (महाले) व दत्तात्रय सपकाळ (महाले) तसेच थोर क्रांतिकारक भाई कोतवाल,राधेश्याम साळुंके,रवींद्र सूर्यवंशी,श्रीपाल राऊत,अमोल राऊत,आकाश काळे,मोहन पोळ,चंद्रकांत शिंदे,राजेंद्र शिंदे यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर माने यांनी केले यावेळी संतोष सपकळ व इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
0 टिप्पण्या