डिजिटल माध्यमांमुळे लोककला संकटात ; सातारकर


शेवगाव प्रतिनिधी

 मनोरंजनासाठी डिजिटल माध्यमांचा तरुण पिढीकडून जास्त वापर होत असल्याने लावणी सारख्या लोककला संकटात सापडल्या असल्याचे मत राष्ट्रीय कीर्तीचे नृत्य कलाकार शिवम सातारकर यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीकडून कोजागिरी निमित्त आयोजित केलेल्या लावणीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीचे अध्यक्ष बाळासाहेब चौधरी,सचिव किसनराव माने ,खजिनदार काकासाहेब लांडे,माजी सह प्रांतपाल डॉ. संजय लड्डा,माजी अध्यक्ष अण्णासाहेब दिघे,डॉ.गणेश चेके,डॉ.भागीनाथ काटे आदी उपस्थित होते.

सातारकर पुढे म्हणाले की, लावणीकडे अश्लील नृत्य म्हणून न बघता महाराष्ट्राची लोककला म्हणून बघितलं गेलं पाहिजे. शिवम सातारकर लावणीच्या कार्यक्रमातुन मिळालेली रक्कम बीड जिल्ह्यातील गेवराई येथील संतोष गर्जे संचलित सहारा अनाथालयाला देतात.

या कार्यक्रमासाठी डॉ.संजय लड्डा,डॉ.आशिष लाहोटी व डॉ.हरिश्चंद्र गवळी यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी डॉ.विकास बेडके, कारभारी नजन, डॉ.प्रतीक्षा बेडके, मनेष बाहेती, डॉ.पुरुषोत्तम बिहाणी, डॉ.दिनेश राठी, बबन म्हस्के, आत्माराम निकम, प्रवीण लाहोटी, योगेश बाहेती, सुधाकर जावळे, डॉ.सुयोग बाहेती, डॉ.मयुर लांडे, आशिष तोतला, प्रा.विजय मुधोळकर, श्रीमंत घुले, दीपक तागड, प्रदीप बोरुडे, संतोष ढाकणे, वसीम सय्यद, दीपक भुक्कन, महेश लाडणे आदी उपस्थित होते.

इनरव्हील क्लब शेवगाव,रोटरी कम्युनिटी कॉर्पस अमरापूर आणि इन्ट्रॅक्ट क्लब अमरापूर यांचे पदाधिकारी उपस्थित होते. या लावणीच्या कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिलीप फलके यांनी तर आभार स्नेहलता लबडे यांनी व्यक्त केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या