शिरुरकासार
तालुक्यातील खोकरमोहा येथील नारायण पिराजी मिसाळ 75 वर्षे या शेतकऱ्याने बॅंकेचे पंतसंस्थेचे असलेले कर्ज तसेच तीन वर्षापासून अतिवृष्टीने थैमान मांडल्याने हातचे पिक गेल्याने सकाळी दहाच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
सायंकाळी मोठ्या शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निसर्गाच्या अतातईपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठु लागला आहे गेली सहा वर्षं सलग पहिले तर तिनं वर्ष दुष्काळाच्या मारा सहन करावा लागला त्यानंतर तिने वर्ष अतिवृष्टीने पुन्हा मारले आहे शेतकरी दुष्काळाच्या दृष्ट चक्रात अडकला असून त्यावर कर्जाचा बोजा जास्तच वाढत चालला असलेल्यांने काही शेतकरी आत्महत्या करत आहेत. असाच प्रकार खोकरमोहा येथील नारायण पिराजी मिसाळ या शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला कर्जबाजरी पणा व सतत पडत असलेली अतिवृष्टीला कंटाळुन आत्महत्या केली. शिरुरकासार पोलिसांनी शवाच्छिदेन प्रेत नातेवाईकाच्या ताब्यात दिले महसुल विभागाच्या आधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे. शोकाकुल वातावरणात संध्याकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यत केला जात आहे.
0 टिप्पण्या