कोट्यावधी खर्चून केलेली रोषणाई बंद


पुणे प्रतिनिधी

सुशोभिकरणाच्या नावाखाली नदीवरील पुलांना तब्बल सहा कोटी रुपये खर्च करून लावलेली विद्युत रोषणाई  अनेक दिवसांपासून बंद आहे. असे असताना पुलांची विद्युत रोषणाई  बंद आहे की सुरू आहे. याचा प्रशासनाला काहीच माहिती नसल्याचे समोर आले आहे. तर रोषणाई च्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी असलेला ठेकेदार उडवा उडवीची उत्तरे देत आहे.

मागील काही वर्षांपासून शहरात सुशोभीकरणाच्या नावाखाली भिंती रंगविणे, सुशोभीत विद्युत पोल उभे करणे, पदपथाचे सुशोभीकरण करणे, भिंती, रस्त्यांचे दुभाजक, चौकांमध्ये शिल्प बसवणे, स्मार्ट बसथांबे, स्मार्ट वाचनालये आदींसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. सुशोभिकरणाचाच एक भाग म्हणून नदीवरील छत्रपती शाहू शेतू, शिवाजी पुल, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुल, छत्रपती संभाजी पुल आणि यशवंतराव चव्हाण पुलास काही महिन्यांपूर्वी 6 कोटी रुपये छर्च करून विद्युत रोशनाई करण्यात आली आहे. या विद्युत रोषणाई ची तीन वर्षे देखभाल दुरूस्ती करण्याची जबाबदारी काम केलेल्या ठेकेदारावर आहे.

मात्र, मागील काही दिवसांपासून या पुलांची विद्युत रोषणाई  बंद आहे. याबाबत महापालिकेच्या विद्युत विभागाकडे विचारणा केली असताना विद्युत विभागाला काहीही माहिती नसल्याचे समोर आले. विद्युत विभागाच्या अधिकार्‍याने संबंधीत ठेकेदाराला फोनवर विद्युत रोशनाई बंद असल्याबाबत विचारणा केल्यानंतर ठेकेदाराने रोषणाई  सुरू असल्याचे सांगत उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने अज्ञात व्यक्तीने विद्युत रोषणाई ची वायर काढल्याचे सांगितले. तर काही पुलांच्या रोषणाई ची वायर महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी काढून टाकल्याचे सांगितले. पालिकेच्या अधिकार्‍यांनी फैलावर घेतल्यानंतर मात्र, ठेकेदाराने लवकरच दुरूस्ती करून रोषणाई सुरू करण्याचे आश्वासन दिले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या