आषाढी वारीची परंपरा संत निळोबारायांनी सुरु केली ; हभप डाॅ.विकासानंद मिसाळ


पारनेर तालुका प्रतिनिधी

प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील श्रीसंत निळोबाराय महाराज यांचा अभंग गाथा प्रकाशन सोहळा व संत निळोबाराय यांच्या राहत्या वाड्यातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जीर्णोद्धाराचे कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या भक्त पंढरी सोहळ्यासाठीची बैठक दि.१६ आॅक्टोबरला पिंपळनेरला पार पडली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हभप डाॅ. विकासानंद महाराज मिसाळ हे होते.यावेळी अध्यक्ष स्थानावरुन बोलताना हभप मिसाळमहाराज म्हणाले,जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज व  संत निळोबारायांनी आषाढी वारीची परंपरा सुरु केली.

प्रास्ताविक करताना संत निळोबाराय देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष अशोक सावंत म्हणाले,संत निळोबा रायांच्या भक्तीपंढरी सोहळ्यामधे रविवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२१ पासून ते २१ नोव्हेंबर २०२१ पर्यंत महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची किर्तनसेवा तसेच निळोबाराय पालखी सोहळ्या सोबत चालणारे वारकरी व परिसरातील १ हजार भाविकांचे निळोबाराय गाथा वाचनाचा लाभ मिळणार आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

रविवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ रोजी श्री संत निळोबाराय महाराज अभंग गाथा प्रकाशन सोहळा, निळोबारायांच्या  राहत्या वाड्यातील स्वयंभू विठ्ठल  - रुक्मिणी मंदिराच्या जिर्णोध्दाराचा उद्घाटन समारंभ  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या हस्ते होणार असुन, प्रमुख पाहुणे म्हणुन, जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे, राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील,गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ,जलसंधारण मंत्री शंकराव गडाख,उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हभप प्रज्ञासूर्य चैतन्य महाराज देगलूकर आणि आषाढी वारीतील मानाच्या १० पालख्यांच्या संस्थानचे प्रमुख, संतांचे वंशज व प्रतिनिधी तसेच जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे सांगीतले.

बैठकीनंतर श्रीसंत निळोबाराय मंदिरामधे भक्तीपंढरी सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेचे  प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी निळोबारायांचे वंशज व पालखी सोहळा प्रमुख हभप  गोपाळ काका मकाशीर, संत निळोबाराय ट्रस्ट अध्यक्ष ज्ञानदेव माऊली पठारे, कार्याध्यक्ष अशोक सावंत, सुरेश ज्ञानदेव पठारे, अनिकेत दादासाहेब पठारे निळोबाराय सेवा मंडळाचे सचिव चांगदेव शिर्के, निळोबाराय ट्रस्टचे सचिव लक्ष्मण खामकर,भाऊसाहेब लटांबळे,सरपंच सुभाष गाजरे,उपसरपंच अमोल पोटे, विजय गुगळे, संपत सावंत, अनिल पोटे, तुळशीराम कळसकर व परिसरातील भाविक तसेच निळोबाराय पायी दिंडी सोहळ्या सोबत चालणारे दिंडी चालक व वारकरी यावेळी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या