तोतया पोलिसांना पुढे करून गैरकारभार

पोलिस निरीक्षकाविरुध्द पोलीस अधीक्षकांकडे तक्रार


पुणे 

पौड पोलिस ठाण्याचे  पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ हे तोतया पोलीस सहकाऱ्यांच्या मदतीने गैरकारभार, बेकायदेशीर कृत्ये, बेकायदेशीर आर्थिक व्यवहार, हप्ता वसुली, जमिनीचे विषय हाताळत असून त्यांच्याविरुद्ध  पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते बंडू नथू मारणे (कोथरुड) यांनी लेखी तक्रार केली आहे. पोलिस नसूनही पोलिसांचा पोशाख परिधान करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे या गंभीर विषयाकडे त्यांनी या तक्रारीद्वारे लक्ष वेधले आहे आणि कारवाईची मागणी केली आहे. 

मारणे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये, पौडचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्यावर लेखी आरोप करण्यात आले असून, ते बेकायदेशीर आर्थिक व्यवहार, हप्ता वसुली, जमिनीचे विषय, तोतया पोलिसांना सहकार्य करणे अशा गोष्टीना प्रोत्साहन देत आहेत,असे म्हटले आहे. त्यांचा हा सर्व कारभार त्यांनी नेमलेले काही पोलिस, काही खासगी  व्यक्ती आणि एक व्यक्ती पोलिस नसूनही पोलिसांचा पोशाख परिधान करून करत असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.

रफीक तांबोळी नामक इसम पोलिस नसतानाही पोलिसांचा पोषाख परिधान करून हप्ते वसूलीची कामे करतो. हा व्यक्ती पोलिस पोषाख परीधान करून पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या सोबत वारंवार असतो. पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या रफिक तांबोळी या तोतया पोलिसावर तसेच पौड पोलिस निरिक्षकांच्या गैरकारभाराविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मारणे यांनी पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्याकडे केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या