वैयक्तिक, शासकीय योजनांवर अधिकाधिक भर द्या

आढावा बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे यांचे प्रतिपादन


लोणी धामणी प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघात गेल्या पंचवार्षिक कालावधीत कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामे मार्गी लावली गेली आहेत. रस्ते, साकव पूल, साठवण बंधारे, बुडीत बंधारे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शाळा वर्गखोल्या, मैदाने विकास तसेच नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. परंतु या सर्वात शेतकरी व ग्रामीण भागातील मुख्य घटक यांना वैयक्तिक, शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त प्रमाणात मिळाला पाहिजे, यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. मोरया मंगल कार्यालय मेंगडेवाडी येथे पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक- अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या आयोजित बैठकीत वळसे पाटील बोलत होते.

यावेळी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक दौलत लोखंडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भगवानराव वाघ, बाजार समितीचे संचालक प्रमोद वळसे, माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, तालुका युवक अध्यक्ष अंकित जाधव, शरद सहकारी बँक संचालक अशोक आदक पाटील, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना संचालक रामचंद्र ढोबळे, माऊली आस्वारे, बाळासाहेब घुले, खरेदी विक्री संघचे संचालक संजय गोरे, मनोज रोडे पाटील, भरत फल्ले, माजी युवक अध्यक्ष निलेश थोरात, लाखणगाव सरपंच प्राजक्ता रोडे पाटील, लोणी सरपंच उर्मिला धुमाळ, निरगुडसर सरपंच उर्मिला वळसे पाटील, उपसरपंच सपना हांडे, पारगाव सरपंच बबन ढोबळे, अवसरी उपसरपंच सचिन हिंगे, जेष्ठ नेते पोपटराव मेंगडे, रानमळा सरपंच राजेंद्र सिनलकर, सतीश पाटील जाधव, नितीन वाव्हळ, बारकू जगताप, दादाभाऊ टाव्हरे, शिरदाळे उपसरपंच मयूर सरडे, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

' राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व जनतेने दिलेला विश्वासाला सार्थ ठरवून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर सर्व मुलभूत सोयी सुविधा, रस्ते, शाळा, आरोग्य, कृषी, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, लघुपाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अंतर्गत मतदारसंघात सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला. तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना, सायकल वाटप योजना विधवा शेतकरी गरजू महिलांना आर्थिक साहाय्य करणे, विविध प्रकारच्या कृषी औजारे वाटप करणे, यांसारख्या योजनांद्वारे ग्रामीण भागातील घटकांना पाठबळ देण्यात आले. आर्थिक वर्ष २०१९-२०, २०-२१ मध्ये पारगाव अवसरी जिल्हा परिषद गटामध्ये रु.५० कोटी पर्यंत निधीची विविध विकासकामे दर्जेदार पद्धतीने सुरु असल्याचे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी प्रास्ताविकपर भाषणात सांगितले.

मांदळेवाडी सरपंच कोंडीभाऊ आदक, उपसरपंच माधुरी आदक, पिरभाऊ आदक, संतोष आदक यांसह कार्यकर्त्यांनी गृहमंत्री वळसे पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.


मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम म्हणाले की जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून तालुक्यांमध्ये अनेक विकासाची कामे केली त्याचबरोबर वैयक्तिक लाभार्थीच्या योजना देखील गोरगरीब जनतेला मिळवून दिल्या परिणामी यापुढील काळामध्ये या जिल्हापरिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेले उमेदवार नक्कीच सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येतील यात तिळमात्र शंका नाही.


विवेक वळसे-पाटील म्हणाले की पारगाव तर्फे अवसरी जिल्हा परिषद गटातील पंचायत समिती गणातील एक जागा आपल्याला गमवावी लागली होती याचे शल्य आमच्या मनात अजून आहे त्यामुळे या गटात सर्वाधिक जिल्हा परिषदचा निधी आणून कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता या गटाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या