Breaking News

राज्यात लवकरच पहिली ते चौथी शाळा सुरु होण्याची शक्यता


मुंबई

प्राथमिक शाळाही लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. राज्यातील इयत्ता पहिली ते चौथी शाळा सुरू करण्याबाबत सर्वच जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी सकारात्मक असून पुन्हा शाळा सुरू करण्यावर जोर असल्याचे दिसत आहे. दरम्यान, मुक्यमंत्री, मंत्रीमंडळ आणि कोविड टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे गायकवाड म्हणाल्या.

वर्षा गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांची बैठक घेत चर्चा केली. या आव्हानात्मक काळात आपल्या शाळा मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतच्या (CEO) बैठकीत सुरु झालेल्या शाळांचा जिल्हानिहाय आढावा,त्याअनुषंगाने तयारी,लसीकरण व नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा आढावा घेतला.


No comments