तरूणांनी व्यवसायात उतरावे सभापती घुले


ढोरजळगांव 

तरूणांनी नोकरी पाठमागे न लागता उत्तम व्यवसाय केला निश्चित फायदेशिर असुन युवक संजय केदार व सोमनाथ केदार यांनी सुरू केलेल्या हॉटेल साईराज च्या माध्यमातुन निश्चित भरभराटी मिळेल असे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती डॉ  क्षितीज घुले यांनी बोलताना व्यक्त केले.

गरडवाडी दिंडेवाडी फाटा येथे संजय केदार व सोमनाथ केदार यांच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या हॉटेल साईराजच्या उद्घाटन प्रसंगी घुले बोलत होते. यावेळी हर्षदा काकडे, संजय कोळगे,सुधाकर लांडे, राजेंद्र देशमुख,  सोमनाथ केदार, आदिनाथ केदार, सतिश केदार, कमलाकर गरड, जयकुमार देशमुख, विष्णू गरड, बापूसाहेब गरड, संतोष केदार, रोहन साबळे, सुरेखा केदार ,सुनिता केदार, भरत भालेराव,  डॉ नामदेव दौंड, आदिनाथ विघ्ने , त्रिंबक केदार, दीपक स्वामी, साईनाथ गरड, आदी उपस्थित होते.

हर्षदा काकडे म्हणाल्या की ग्रामीण भागातील युवकांनी व्यवसाय उत्तम प्रकारे केला बेरोजगारांना ही रोजगार निश्चित उपलब्ध होईल कष्ट करण्याची जिद्द व चिकाटी प्रत्येकाने अंगी कारली तरी असाध्य गोष्टही निश्चित साध्य होईल त्यासाठी व्यवसायात चांगली मजल गाठुन आपले नाव कमविण्यासाठी प्रयत्नवादी राहवे संजय केदार व सोमनाथ केदार यांनी अत्यंत प्रतिकुल परीस्थितीतुन व्यवसाय सुरू करून तरूणासमोर एक आदर्श निर्माण केला असल्याचे काकडे बोलताना म्हणाल्या सुत्रसंचालन संजय केदार यांनी तर आभार सोमनाथ केदार यांनी मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या