कन्या व तृतीयपंथीयांचे पूजन हे ईश्वराचे पूजन ; आ. पाटील


पुणे प्रतिनिधी

नवरात्रात अष्टमी हा फार महत्वाचा दिवस असून या दिवशी कन्या पूजन केले जाते. आज या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुलींना ड्रेस तर तृतीयपंथीयांना साड्या भेट देऊन त्यांचे अनोखे पूजन केले जात आहे. याचे समाधान वाटते असे भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका व ह्या नवरात्र उत्सवाच्या संयोजिका मंजुश्री खर्डेकर, उत्सव प्रमुख सौ. श्वेताली भेलके, नगरसेविका वासंती जाधव, हर्षाली माथवड,क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,  विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके,कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, स्वीकृत सदस्य बाळासाहेब टेमकर, सुरेखाताई जगताप, सुवर्णा काकडे, सचिन मोकाटे, जगन्नाथ कुलकर्णी, सरचिटणीस दिनेश माथवड, नवनाथ जाधव, युवा उत्सव प्रमुख प्रतीक खर्डेकर, मोहित भेलके व इतर मान्यवर उपस्थित होते.मुलींचे आणि तृतीयपंथीयांचे पूजन म्हणजेच परमेश्वराचे पूजन असे मी मानतो असेही यावेळी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. 

तृतीयपंथी्यांसाठी काम करणाऱ्या द मिस्ट संस्थेच्या सोनाली दळवी यांनी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय खात्यामार्फत मिळणारा आमच्या हक्काचा निधी मिळावा अशी मागणी मांडली, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृतीयपंथीयांच्या लिंगबदल शस्त्रक्रिया ह्या रुग्णालयातील मोफत उपचारात समाविष्ट केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानताना ह्याचा लाभ मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. कोरोनाच्या संकटाचा विचार करून यावर्षी मंदिरातच देवीची प्रतिष्ठापना केली असून उत्सव ही सांस्कृतिक कार्यक्रमाविना साजरा करत असल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संदीप खर्डेकर यांनी तर संयोजन व आभार प्रदर्शन विशाल भेलके यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या