कुपोषित बालकांना पोष्टिक आहाराचे किट वाटप


अजनुज प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी ग्रामपंचायत मार्फत अंगणवाडीतील कुपोषित बालकांना पोष्टिक आहाराचे किट वाटप सरपंच सुदामराव नलवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती नलगे यांनी यावेळी सांगितले की लहान बालकांना मातांनी योग्य सकस असा आहार देण्याकडे दुर्लक्ष करू नये जेणे करून बालकांचे वजन वाढीस मदत होईल.मातांनी देखील योग्य आहार घेणे गरजेचे असून तो वेळेवर घेणे गरजेचे आहे असे ही नलगे यांनी सांगितले.

यावेळी ग्रामविकास अधिकारी राजू दराडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आज ग्रामिण भागात धावपळीत वेळेवर जेवण न घेता चालढकल केली जाते ही बाब योग्य नाही.महिलांनी लहान बालकांना योग्य वेळी आहार देणे गरजेचे असून त्यात फळे, पालेभाज्या यांचा देखील सामावेश करावा. मुलांना आपण किती आहार दिला त्यातील किती घेतला याचा विचार करावा असे ही दराडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य संपत वाघ,माऊली खामकर, फक्कड गिरमकर,आंबदास खामकर, अंगणवाडी सेविका सुनिता भोसले,लता खामकर,वैशाली थोरात, अर्चना भोयटे,सिमा पाचपुते, मदतनीस अरुणा ढमढेरे आदि उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या