ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांवरील क्वारंटाईनचा नियम मागे


नवी दिल्ली 

ब्रिटनने भारतातील प्रवाशांसाठीची जाचक क्वारंटाईनचा नियम रद्द केल्यानंतर भारतानंही ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांवरील क्वारंटाईनचा नियम मागे घेतला आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, १ ऑक्टोबर २०२१ रोजी भारतात येणाऱ्या ब्रिटनच्या नागरिकांसाठी असलेली नियमावली मागे घेण्यात आली आहे.

युकेमधील नागरिकांना भारतात आल्यानंतर १० दिवसांसाठी क्वारंटाइन होणे बंधनकारक करण्यात आले होते. तसेच ब्रिटनहून येणाऱ्या सर्व प्रवाशांना विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी आणि भारतात आल्यानंतर आठ दिवसांनंतर पुन्हा एकदा आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागत होती. त्यानंतर आता ब्रिटन सरकारने 11 ऑक्टोबरपासून पूर्णपणे लसीकरण केलेल्या भारतीयांसाठी क्वारंटाइनचे नियम काढून टाकले. भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी जाहीर केले होते की ब्रिटनने भारतीय प्रवाशांना सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना कोविशील्ड किंवा इतर कोणत्याही ब्रिटन सरकारने मंजूर केलेल्या लसीद्वारे लसीकरण केले आहे. 11 ऑक्टोबरपासून यूकेमध्ये प्रवेश केल्यावर अशा भारतीय प्रवाशांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यातून सूट दिली जाईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या