Breaking News

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ


मुंबई

क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून चर्चेत असलेले मुंबई NCB चे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची अंतर्गत (डिपार्टमेंटल) चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची सुटका करण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितली असा आरोप आहे. NCB चे उपमहासंचालक आणि मुख्य दक्षता अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी ही माहिती दिली. तेच या प्रकरणी वानखेडे यांच्यावर निगराणी ठेवत आहेत.

चौकशी सुरू असतानाही ते या पदावर काम कसे करत आहेत? असा सवाल आण्ही ज्ञानेश्वर सिंह यांना केला. त्यावर बोलताना, आम्ही आताच चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे यावर आताच काही म्हणणे योग्य ठरणार नाही असे ते म्हणाले. एका निःपक्ष साक्षीदाराच्या साक्षीने शपथपत्राच्या माध्यमातून सोशल मीडियावर काही तथ्य प्रसारित करण्यात आले आहेत. त्याचीच दखल घेऊन एनसीबीच्या महासंचालकांनी दक्षता विभागाला चौकशी करण्याच्या सूचना केल्या आहेत. आज आदेश जारी झाले, आता साक्ष आणि तथ्यावरच चौकशी केली जाईल असे सिंह यांनी म्हटले आहे.

मला टार्गेट केले जात आहे - समीर वानखेडे 

NCB चे झोनल संचालक समीर वानखेडे यांनी सोमवारी स्पेशल NDPS कोर्टात हजेरी लावली आणि दोन शपथपत्र दाखल केले. त्यानुसार, आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना मुद्दाम टार्गेट केले जात असल्याचे वानखेडे म्हणाले. लोकांनी बहीण आणि स्वर्गीय आईला सुद्धा यात टार्गेट केले. कुठलीही चौकशी होऊ द्या मी तयार आहे. ड्रग्ज प्रकरणाला कमकुवत करण्यासाठी हा खटाटोप सुरू असून यामुळे आपल्याला देखील धोका असल्याचे समीर वानखेडे यांनी म्हटले आहे.


No comments