Breaking News

नगरसेवकांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याकडे कल


पुणे प्रतिनिधी

वॉर्ड स्तरीय निधीतून, तसेच स यादीतून नगरसेवक त्यांच्या इच्छेनुसार प्रभागात कामे करतात. त्यात कापडी पिशव्या वाटप करण्यापासून आता मास्क देखील खरेदी करत आहेत. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने नगरसेवकांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याकडे कल वाढला आहे.

महापालिकेच्या मुख्य खात्यात शहरात ९९५ सीसीटीव्ही लावले आहेत. मात्र, नगरसेवकांनी २ हजार ४६५ सीसीटीव्ही लावले आहेत.

पुणे महापालिकेच्या ऑक्टोबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेत लेखी प्रश्‍नोत्तरातून ही माहिती समोर आली आहे. नगरसेविका वृषाली चौधरी यांनी यासंदर्भात प्रश्‍न विचारला होता.

शहरातील सुरक्षेच्या कारणास्तव महापालिकेने स्वतःच्या मिळकतींसह उद्याने, रस्ते, सीसीटीव्हीच्या नजरेत आणले आहेत. यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाने सीसीटीव्ही खरेदी केले आहेत, पण ते केवळ प्रमुख ठिकाणीच असल्याने प्रभागातील गल्लीबोळ त्यात येत नाही. यासाठी नगरसेवकांनी प्रभाग निधीतून किंवा स यादीतून सीसीटीव्ही बसविण्यात सुरवात केली.


No comments