शिरुरकासार
पेट्रोलचे दर एकीकडे वाढत असताना डिझेलचाही भडका उडाला असून शंभर रुपये लिटरपर्यत भाव पोहाचले आहेत. वाढत्या इंधन दरामुळे माल वाहतुकदारांनी जानेवारीपासून पंधरा टक्के दर वाढविलेले आहेत. त्याचा परिणाम अनलॉक नंतर जाणवला. मात्र त्यानंतरही पेट्रोल व डिझेलची दरवाढ सुरुच आहे. त्याचा परिणाम मालवाहतुक दरावर होत असून जीवनावश्यक वस्तुंचे दर हळुहळु महाग होत चालले आहेत. नवरात्रोत्सवात तर डिझेलचे शंभरी गाठली आहे. बीड जिल्ह्यात दळणवळण आणि मालवाहतुकीसाठी रेल्वेची सोय नसल्याने ट्रक द्वारे मालवाहतुक होते. काही जीवनावश्यक वस्तु सोडता गहु तादुळ , शाबुदाणा, तुपाची परराज्यातून आवक होते. मालवाहतुकीच्या दरामुळे दैनंदिन वापरातील वस्तुच्या किंमतीवर परिणाम झालेला आहे.
जीवनावश्यक किराणा सहित्याचे दर वाढत आहेत. किमतीमध्ये १०ते १५ टक्के वाढ झाल्याचे दिसत आहे. डिझेलचे दर वाढल्याने मालवाहतुक दर आणखी वाढणार असल्याने त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तुंच्या दरावर होणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत सर्वसामान्य जनतेला महागाईशी सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.
बीड जिल्हयात बहुतांश जीवनावश्यक वस्तु धान्य डाळी याची इतर जिल्ह्यातून व परराज्यातून आवक होते. लांब पल्ल्याकडून किंवा राज्यांतर्गत असो लागणाऱ्या मालवाहतुकीच्या दरात २० ते २२ टक्केपर्यत वाढ झाली आहे. त्यामुळे दहा टन मालाच्या वाहतुकीला लागणाऱ्या दरात चार ते पाच हजार रुपयांची वाढ झाली आहे. ३५ हजार रुपये भाडे आधी लागत होते. आता हे ४० हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
एप्रिलपासून पेट्रोल दरात भडका होत राहिला. त्यापाठोपाठ गॅस सिलिंडर आणि डिझेलच्या दरातही वाढ झाली. सध्या डिझेलचे भाव ९९ रुपये ३० पैसे म्हणजे शंभरपर्यंत आहेत. जेथून मालाचा पुरवठा होतो येथील डिझेलचे दर काहीसे जास्त आहेत. परिणामी भाववाढ होणार आहे.
किराणा ही महागणार
जिल्हयात गहु मध्यप्रदेशातुन तर तांदुळ दिल्ली, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, आध़प्रदेश आणि विदर्भातुन आयत होतो. नारळ डाळी लातुर, अकोला तर इतर आवश्यक वस्तुंची पुणे नगरच्या बाजारपेठेतुन आवक होते जीवनावश्यक वस्तुंची गुजरातेतून आवक होत आहे
हे महागणार
चहा , साखर, मुगडाळ, उडीदडाळ, चनाडाळ, सुकामेवा, गुळ, तांदुळ, शाबुदाणा इ. दिवाळीच्या तोंडावर गृहिणीनां खर्चाचा ताप.
दर महिन्याला महागाई वाढत असल्याने प्रत्येक गरजेच्या वस्तुंचे भाव वाढल्याचे ऐकायला मिळते. त्यामुळे किचन बजेट कोलमडले आहे. आधीपेक्षा आता प्रत्येक महिन्याला किराणासाठी दोन ते अडीच हजार रूपये जास्त मोजावे लागत असून मोदी सरकार 'कसं ग बाई गोड गोड बोलुन लुटायला लागले' असल्याचे कडवट प्रतिक्रिया महिलांच्या तोडातून ऐकावयास मिळत आहे.
0 टिप्पण्या