ड्रग्ज प्रकरणाचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात उमटणार : नबाब मलिक


मुंबई

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यंदाचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन वादळी होणार असल्याचे म्हटले आहे. मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. सध्या गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या सभागृहात उमटणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.

सध्या राज्यात सुरु असलेल्या अमली पदार्थांच्या मुद्द्यावरुन माझ्यावर बरेच आरोप केले जातील असे मलिक म्हणाले.

 मलिक यांनी समीर वानखेडेंच्या कार्यपद्धतीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याच दरम्यान त्यांनी अनेक गौप्यस्फोटही केले. काल आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर आज त्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्दे मांडले. त्यावेळी बोलताना त्यांनी समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्र, काशीब खान आणि एनसीबीला दिलेले पत्र, यासह विविध मुद्यांवर प्रतिक्रिया दिली. तसेच यावेळी त्यांनी खरी लढाई आता विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात होणार असून त्यावेळी पुन्हा गौप्यस्फोट करेल, त्यावेळी भाजपा नेते रस्त्यावर फिरु शकणार नाही, असा इशाराही त्यांनी भाजपाच्या नेत्यांना दिला.

काल आर्यन खान याला जामीन मिळाला आहे. खरे तर एनसीबीने आर्यनवर ज्या प्रकारे आरोप लावले त्यावरून त्याला किला कोर्टातूनच जामीन मिळालायला हवा होता. मात्र, एनसीबीने जामीन रोखण्याचा प्रयत्न केला. गुन्हा सिद्ध होईपर्यंत जेलमध्ये ठेवणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे, असे नबाब मलिक म्हणाले.

 'कुटूंबियांना गोवले हा वानखेडेचा आरोप चुकीचा आहे. माझी लढाई कुटूंबाविरोधात किंवा धर्माविरोधात नाही तर अन्यायाविरोधात आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. नवाब मलिक यांना एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने पत्र पाठवले होते. त्यावर कोणतेही नाव नव्हते. ते पत्र मी एनसीबीला दिले आहे. या पत्रात 26 प्रकरणांची नावे आहेत. यात खारघर येथील नायझेरीन प्रकरणाचीही उल्लेख आहे. याच प्रकरणातील एका पंचाने खुलासा करत ही त्याच्याची कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या, असे सांगितले आहे. त्यामुळे याची चौकशी व्हावी, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या