आघाडी सरकारच्या निषेधार्थ मनसेचा काळा दसरा आंदोलन


पुणे

शेतकऱ्यांच्या विविध समस्या व प्रश्न बरेच दिवसापासून प्रलंबीत आहेत. ऊसाला योग्य दराने एफआरपी ही राज्य सरकारच्या महविकास आघाडी सरकारने दिली नाही. म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दसरा दिवशी शेतकऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात व आघाडी सरकारच्या निषेधार्थ काळा दसरा आंदोलन केले.

काळा दसरा आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नाही म्हणून  जिल्हाधिकारी कार्यालयाला रावणाचे दहन करून आंदोलन केले गेले. काळा दसरा आंदोलन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार करण्यात आले. या काळा दसरा आंदोलनाचे नेतृत्व मनसेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र गारुडकर यांनी केले. या काळा दसरा आंदोलनाला बाबू वागस्कर,मनसेच्या रूपाली पाटील-ठोंबरे, निरंजन चव्हाण उपाध्यक्ष मावळ तालुका मनसे, मोझस दास, विशाल लोंढे, मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे,  मनसेचे पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी, व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रवींद्र गारुडकर म्हणाले,या सरकारने 2-3  वर्ष झाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. आमच्या राज्य सरकारकडे खूप मागण्या आहेत. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा. ऊसाला योग्य दराने एफ आर पी ही राज्य सरकारने द्यावी. म्हणून आज आम्ही रावणाचे दहन करून काळा दसरा आंदोलन करत आहोत. जर या सरकारने 8 दिवसात शेतकऱ्यांचा मागण्या पूर्ण केल्या नाही तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू असा इशारा आंदोलनाच्या वेळी रवींद्र गारुडकर यांनी दिला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या