मिठाई दुकानात भेसळयुक्त खवा

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई


बारामती 

दिपावलीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (दि:३०) रोजी बारामतीत अनेक ठिकाणी धाडसत्र राबवले. या दरम्यान  शहरातील भिगवण रस्त्यावरील हिंद स्वीटस या मिठाईच्या दुकानामध्ये तब्बल ५० किलो भेसळयुक्त खवा आढळून आला. हा भेसळयुक्त खवा आढळून आल्याने हिंद स्वीट्स मिठाई दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने लगेचच कारवाई केली आहे.

संबंधित खवा पुरवठादारही शोधला असून त्याच्यावरही कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, भेसळयुक्त खवा मिळून आल्यानंतर अन्न औषध प्रशासनाकडून हिंद स्वीटस हे मिठाईचे दुकान १५ दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दिपावलीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने आज बारामतीत अनेक ठिकाणी धाडसत्र राबवले. त्यामध्ये बारामती शहरात नव्यानेच सुरु झालेल्या हिंद स्वीटस या दुकानात तब्बल ५० किलो भेसळयुक्त खवा आढळून आला. या खव्याच्या पुरवठादाराचाही अन्न व औषध विभागाने शोध घेतला असून त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या