बालवडीत जलनेती अभियान संपन्न


भोर 

प्राचीन भारतीय संस्कृतीत जलनेती प्रयोगाचे महत्त्व विशद करण्यात आले असून कोरोना काळात संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी भारतीय योग विद्याधामच्या वतीने जलनेती प्रयोगाचे आयोजन करण्यात आल्याचे योग विद्याधाम भोरचे अध्यक्ष नंदकुमार देवी यांनी सांगितले.

जलनेती पात्रात योग्य प्रमाणात मीठ असलेले गरम पाणी घेवून एका नाकपुडीतून आत घेऊन दुसऱ्या नाकपुडीद्वारे बाहेर सोडणे म्हणजे जलनेती.जलनेती केल्याने नासिका मार्गातील विषाणू बाहेर फेकले जातात.कोरोना काळात जलनेती अत्यंत प्रभावी ठरत असुन घरच्या घरी कमी खर्चात करता येण्यासारखा उपाय असल्याचे योग गुरु अनुराधा देवी म्हणाल्या.बालवडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भीमराव शिंदे यांचे पुढाकाराने गावातील महिलांनी जलनेती प्रात्यक्षिकाचा अनुभव घेतला.योग गुरु नंदकुमार देवी,अनुराधा देवी यांचे मार्गदर्शनाखाली योगशिक्षक प्रा.शहाजी लगड,सुनिता लगड,निर्मला किंद्रे यांनी जलनेतीचे प्रात्यक्षिक करून दाखवले.यावेळी सरपंच सुवर्णा किंद्रे, महादेव बदक,आनंदा सावले उपस्थित होते.उपस्थित महिलांना जलनेती पात्राचे मोफत वाटप करण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या