नियती शिंदे यांना लायन्सचा स्त्री शक्ती पुरस्कार जाहीर


आळंदी

द.इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स कल्ब प्रांतचे जिल्हा वुमन एम्पोवरमेंट कमिटी,पुणे आयोजित दुर्गे प्रमाणे खंबीरपणे लढा देऊन यशस्वी झालेल्या स्त्रियांना दिला जाणारा मानाचा लायन्स स्त्री शक्ती पुरस्कार यंदा श्री क्षेत्र आळंदी देवाची येथील मातोश्री वृद्धाश्रमाच्या प्रमुख नियती शिंदे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.

नियती शिंदे यांना ला.हेमंत नाईक आणि प्रसिद्ध लेखिका डाॅ.प्राजक्ता कोळपकर यांच्या हस्ते लायन्स स्त्री शक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी ला.ज्योती तोष्णीवाल,ला.राजेश कोटावडे,ला.अक्षय शास्त्री,ला.पीना मुझुमदार,ला.प्रा.शैलजा सांगळे,ला.प्रिती बोंडे,नियती फौंडेशनचे संचालक विकास शिंदे उपस्थित होते.   

माऊलींच्या पुण्यभूमीत अनेक वृद्ध नागरिकांना नियती फौंडेशनच्या मातोश्री वृद्धाश्रम च्या माध्यमातून आधार देण्याचे काम करण्यात येत आहे.गेली अनेक वर्ष या वृद्धाश्रमात अनेक वृद्ध नागरिकांना नियती शिंदे यांनी आधार दिला आहे, त्याचबरोबर महिलांच्या अनेक मुलभुत प्रश्नांनावर आवाज उठवला असुन ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुद्धा नियती फाउंडेशनच्या मार्फत कार्य केले जात आहे.याच समाजकार्याच्या मुळे नियती शिंदे यांना लायन्सचा श्री शक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून हा पुरस्कार त्यांच्या कार्याची पावती समजली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या