हिम्मत असेल तर समीर वानखेडेंवर कारवाई करुन दाखवा

नितेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा

Nitesh rane

मुंबई

आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणूक प्रचारा दरम्यान ते माध्यमांशी बोलत होते. मराठी माणसावर अन्याय होत असताना शिवसेना गप्प का बसली आहे. तुम्हाला वानखेडेंवर राग आहे, तर सचिन वाझेंवर इतके प्रेम का? तुमचे हप्ते घरी आणून देत होता म्हणून का? असा प्रश्न विचारत राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. हिम्मत असेल तर समीर वानखेडेंवर कारवाई करुन दाखवा, मग पुढचा कार्यक्रम आम्ही करू, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर या मराठी माणसावर अन्याय होत असताना शिवसेना गप्प का बसली आहे. नवाबाचे लाड का केले जात आहेत? शिवसेनेचा मराठी बाणा कुठे गेला?, असा सवाल करत नितेश राणे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला.

भाजपाकडून सचिन वाझेवर कारवाई करण्याची मागणी केली असता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो ओसमा बीन लादेन आहे का?, असा सवाल विधीमंडळात उपस्थित केला होता. आता आम्ही विचारतो आहे की वानखेडे काय दाऊद इब्राहिम आहे?, त्या नबावांचे इतके लाड का केले जात आहेत?, असे सवाल उपस्थित करून राणे यांनी महाविकास आघाडीचा समाचार घेतला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या